नवी दिल्ली, ८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने धाड टाकली आहे. साहू यांच्या संपर्कातील इतर काही व्यक्तींच्या संपत्तीचीही चौकशी सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणात २०० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाने साहू प्रकरणात झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. धीरज साहू भागीदार असलेल्या एका कंपनीच्या कपाटांमध्ये कोट्यवधींची बहिशेबी रोकड सापडली आहे. आयकर विभाग जप्त केलेल्या नोटांची यंत्रांद्वारे मोजणी करत आहे. रोखीचे स्वरुप बघता सलग तीन ते चार दिवस मोजणी करावी लागेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.