अमरावती, २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना कौशल्य विकास योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी नियमित जामीन मिळाला. नायडू यांना ९ सप्टेंबर २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना ऑक्टोबरच्या सुरुवातीला २८ नोव्हेंबरपर्यंत हंगामी जामीन देण्यात आला. या हंगामी जामिनाची मुदत संपण्याआधीच सोमवार २० नोव्हेंबर २०२३ रोजी चंद्राबाबू नायडू यांना नियमित जामीन मिळाला.
ऑक्टोबर महिन्यात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यायची असल्याचे कारण देत चंद्राबाबू नायडू यांनी जामीन मिळावा असा अर्ज केला होता. न्यायालयाने वैद्यकीय कारणामुळे चंद्राबाबू नायडू यांना हंगामी जामीन दिला होता. हंगामी जामिनाच्या काळातील वर्तन आणि तब्येतीची ताजी स्थिती यांचा आढावा घेतल्यानंतर न्यायालयाने चंद्राबाबू नायडू यांना नियमित जामीन देण्याचा निर्णय घेतला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.