पाकिस्तानच्या मियांवाली हवाई तळावर हल्ला

पाकिस्तानच्या मियांवाली हवाई तळावर हल्ला

मियांवाली, ४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पाकिस्तानच्या मियांवाली हवाई तळावर हल्ला झाला. तेहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याचे पाकिस्तान सरकारने सांगितले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं नष्ट झाली. हवाई तळावरील अनेक सुरक्षा रक्षक जखमी झाले. भल्या पहाटे हल्ला झाला. हवाई तळाच्या संरक्षक भिंतीला शिड्या लावून सशस्त्र दहशतवादी वेगाने हवाई तळावर आले. कोणालाही लक्षात येण्याआधी गोळीबार करत दहशतवाद्यांनी हल्ला सुरू केला. सुरक्षा रक्षकांनी एक – एक करत सर्व दहशतवाद्यांना ठार केले, अशी माहिती पाकिस्तान सरकारने दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version