गाझातील १५० भूमिगत दहशतवादी तळ नष्ट

गाझातील १५० भूमिगत दहशतवादी तळ नष्ट

गाझा, २८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : इस्रायलने शुक्रवार – शनिवार दरम्यान रात्री मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्यात गाझा पट्टीतील हमासचे १५० भूमिगत दहशतवादी तळ नष्ट झाले. ही माहिती इस्रायलच्या संरक्षण विभागाने दिली. हवाई हल्ल्यांमध्ये हमासचे अनेक दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एरियल कमांडर असेम अबू रकामा याचाही समावेश असल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण विभागाने दिली. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये मोठा दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्याचे सूत्रसंचालन करणाऱ्या प्रमुख दहशतवाद्यांमध्ये असेम अबू रकामा याचा समावेश होता. ड्रोनद्वारे केलेले हल्ले तसेच पॅराशूटच्या मदतीने इस्रायलमध्ये घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी असेम अबू रकामा याच्याकडे होती, असे इस्रायलच्या संरक्षण विभागाने सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version