अहमदाबाद, २३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : दीड हजार कोटींची उलाढाल असलेल्या वाघ बकरी चहा कंपनीचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे ४९ व्या वर्षी निधन झाले. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून स्वतः वाचवण्याच्या प्रयत्नात ते पाय घसरून पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला मार लागला आणि ब्रेन हॅमरेज झाले. अहमदाबादच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पराग देसाई यांच्याकडे चहा कंपनीच्या विक्री, विपणन आणि निर्यात विभागाची जबाबदारी होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.