आझम खानला सात वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा

आझम खानला सात वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा

नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला याने जन्माचा बनावट दाखला वापरल्याचे उघड झाले. या प्रकरणात आझम खान, त्यांची पत्नी तजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला या तिघांना न्यायालयाने दोषी ठरवले आणि सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने निकाल देताच पोलिसांनी आझम खान, तजीन फातिमा आणि अब्दुल्ला या तिघांना ताबडतोब ताब्यात घेतले आणि पोलीस सुरक्षेत तुरुंगात रवाना केले.

अब्दुल्ला याच्याकडे जन्माचे दोन वेगवेगळे दाखले आहेत. हे दाखले तो सोयीनुसार वापरत आहे; अशा स्वरुपाची तक्रार दाखल झाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात आली. अब्दुल्लाने या प्रकरणात जिल्हा न्यायालयात १६ ऑक्टोबर रोजी पुनर्विचारासाठी याचिका दाखल केली. सर्व बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने पुनर्विचाराची मागणी फेटाळली आणि आझम खान, त्यांची पत्नी तजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला या तिघांना दोषी ठरवले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version