नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : केंद्र सरकारने साखर निर्यातीवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत वाढवले आहेत. आधी साखरेच्या निर्यातीवर ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंतच निर्बंध लागू होते. आता पुढील आदेश येईपर्यंत भारताने साखर निर्यातीवरील निर्बंध वाढवले आहेत. विदेशी व्यापार महासंचालनालयाने हा निर्णय घेतला आहे. कच्ची साखर, पांढरी साखर, शुद्ध साखर आणि सेंद्रिय साखर यांच्या निर्यातीवर निर्बंध आहेत. सवलतीच्या सीएक्सएल आणि टीआरक्यू कोट्यांतर्गत निर्यात केल्या जाणाऱ्या साखरेवर निर्बंध नसतील, असेही केंद्र सरकारने सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.