शहनाज गिल रुग्णालयात दाखल

शहनाज गिल रुग्णालयात दाखल

मुंबई, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : अभिनेत्री शहनाज गिल ही तिच्या हटके अंदाजामुळे समाज माध्यमांवर नेहमीच चर्चेत असते. पण सध्या ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ते म्हणजे अभिनेत्री शहनाज गिल हिला रुग्णालयात दाखल केले आहे. अलीकडेच शहनाज गिलने रुग्णालयातून एक व्हिडिओ समाज मध्यमांवर सामायिक करत आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली. हे पाहून शहनाज गिलच्या चाहत्यांची चिंता वाढू लागली आहे.

शहनाज गिलने रुग्णालयातून इंस्टाग्राम लाइव्ह केले होते. याचा एक व्हिडिओ चाहत्यांनी ऑनलाइन शेअर केला आहे. त्यात शहनाज गिल रुग्णालयाचे कपडे घालून हॉस्पिटलच्या बेडवर पडून ती म्हणाली होती, “देखो समय सबका आता है, सबका जाता है. मेरे साथ भी वही हुआ है. फिर आएगा थोडे दिन बाद. मित्रांनो, मी आता ठीक आहे. मला बरं नव्हतं. मला संसर्ग झाला होता. मी सँडविच खाल्लं होतं त्यामुळे मला त्याचं इन्फेक्शन झालं होतं.”

काय झालंय शेहनाजला

अभिनेत्री शहनाज गिलने समाज माध्यमांवर सामायिक केलेल्या व्हिडिओत तिने सांगितले की, तिने सँडविच खाल्ल होतं त्यामुळे तिला इन्फेक्शन झालंय. त्यामुळे काही दिवस तरी ती रुग्णालयात उपचार घेणार आहे.

अभिनेत्री शहनाज गिल सध्या मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत होती. आता तिची प्रकृती ठीक आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version