सिक्कीममध्ये ढगफुटीनंतर पूर, वाहून गेले २३ जवान

सिक्कीममध्ये ढगफुटीनंतर पूर, वाहून गेले २३ जवान

ल्होनक, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : सिक्कीममध्ये ल्होनक खोऱ्यात ढगफुटीनंतर तिस्ता नदीला पूर आला. या पुरात २३ जवान वाहून गेले. वाहून गेलेल्या जवानांचा शोध सुरू आहे.

मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ढगफुटी झाली. यानंतर तिस्ता नदीला पूर आला. नदीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढू लागताच चुंगथांग धरणातून पाणी सोडावे लागले. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आणि थोड्याच वेळात तिस्ता नदीच्या किनाऱ्याजवळ असलेले भाग पाण्यात बुडण्यास सुरुवात झाली. सिंगताम जवळ बारदांग येथे लष्कराची ४१ वाहने वाहून गेली.

ढगफुटीनंतर तिस्ता नदीच्या पाण्याची पातळी थोड्याच वेळात पंधरा ते वीस फुटांनी वाढली. यामुळे मोठे संकट आले. नदी किनारी असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले. याआधी सिक्कीममध्ये १६ जून २०२३ रोजी ढगफुटी झाली होती. पेक्योन्ग येथे जमीन खचली आणि ढगफुटी झाली. यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते.

हवामान विभागाने बुधवारी (४ ऑक्टोबर) आणि गुरुवारी (५ ऑक्टोबर) मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version