स्वीडन, २९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : स्टॉकहोममधील ढोल-ताशा पथकाचे संस्थापक अभिनय सरकटे आणि गोथेनबर्गमधील प्रणाली मानकर यांनी पहिल्यांदा प्रयत्न केले. त्यांनी एकत्रितपणे ‘स्वराज्य ढोलताशा पथक’ स्थापन केले. या पथकाने स्वीडनमधील गणेश मंदिरातील पहिल्याच सादरीकरणात उल्लेखनीय कामगिरी केली. प्रेक्षकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला.
गणेश विसर्जनाच्या उत्सवानिमित्त स्वराज्य ढोलताशा पथकाने सलग दोन तास धमाकेदार परफॉर्मन्स केला. भाविकांनी त्याला जोरदार प्रतिसाद देत, बाप्पा मोरयाच्या गजरात, ढोलताशाच्या तालावर ठेका धरला. स्वीडिश ध्वजाच्या निळ्या आणि पिवळ्या रंगांची छटा असलेल्या या पथकाच्या खास पेहरावाने स्वीडिश भूमीवर भारतीय परंपरेशी सुरेख मिलाफ साधला.
“स्वराज्य ढोलताशा पथकाचा प्रवास आता कुठे सुरू झाला आहे. सातासमुद्रापार आम्ही आमच्या सांस्कृतिक समृद्धीचा प्रसार करण्यासाठी कटिबद्ध आहोत.” अशी प्रतिक्रिया जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना पथकाच्या प्रमुख प्रणाली मानकर यांनी दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.