भारतातील हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन

भारतातील हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन

चेन्नई, २८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतातील हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांचे गुरुवारी चेन्नईत निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते.

स्वामीनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी कुंभकोणम येथे झाला. ते ९१७२ ते १९७९ या काळात ‘इंडियन काउंसिल ऑफ अॅग्रीकल्चरल रिसर्च’चे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी भारत सरकारने त्यांचा पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला. स्वामीनाथन हे भारतातील प्रमुख कृषी शास्त्रज्ञ होते. त्यांना संशोधन धान्याची अशी बियाणे विकसित केली ज्यांच्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन काढणे शक्य झाले.

पोलीस व्हायचे होते पण…

स्वामीनाथन यांचे वडील एम. के. संबासिवन शल्यविशारद होते. पण स्वामीनाथन यांना पोलीस व्हायचे होते. ते १९४० मध्ये पोलीस अधिकारी होण्यासाठीची परीक्षा उत्तीर्ण झाले. पण गांधी विचारांच्या प्रभावातून त्यांनी कृषी क्षेत्रात संशोधन करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित दोन पदव्या घेतल्या. उच्चशिक्षण घेऊन त्यांनी कृषी संशोधन सुरू केले.

भारतात हरित क्रांती

कृषी शास्त्रज्ञ म्हणून केंद्रीय कृषीमंत्री सी. सुब्रह्मण्यम यांच्यासोबत १९६४ ते १९६७ आणि जगजीवन राम यांच्यासोबत १९६७ ते १९७० आणि १९७४ ते १९७७ या काळात त्यांनी काम केले. कृषी शास्त्रज्ञ म्हणून स्वामीनाथन यांनी देशातील हरित क्रांतीत महत्त्वाची भूमिका बजावली. रसायनशास्त्र आणि जैवशास्त्राच्या मदतीने भारताने गहू आणि तांदूळ या दोन पिकांचे उत्पादन वाढवले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version