दहशतवादी हाफिज सईदच्या मुलाचे अपहरण

दहशतवादी हाफिज सईदच्या मुलाचे अपहरण

पेशावर, २८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा कमालुद्दीन सईद याचे अपहरण करण्यात आल्याचे वृत्त व्हायरल झाले आहे. कमालुद्दीनला कारमधून अज्ञातस्थळी नेण्यात आले. पोलीस कमालुद्दीनला शोधत आहेत, अशीही चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. व्हायरल वृत्तानुसार कमालुद्दीनचे बुधवारी संध्याकाळी अपहरण करण्यात आले. अद्याप त्याच्याविषयी कोणतीही ताजी माहिती मिळालेली नाही. यामुळे अपहरण करून कमालुद्दीनची हत्या करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

कोण आहे हाफिज सईद ?

मुंबईत झालेल्या २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद हा भारताला हव्या असलेल्या मुख्य आरोपींच्या यादीत आहे. दहशतवादी हाफिज सईद हा जमात-उद-दवा आणि लष्कर-ए-तैयबा या दोन्ही बंदी असलेल्या संघटनांचा संस्थापक आहे. हाफिज सईद याला पकडणाऱ्या किंवा त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती देणाऱ्या व्यक्तीला अमेरिका सरकारने एक कोटी अमेरिकी डॉलरचे इनाम १ एप्रिल २०१२ रोजी जाहीर केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version