भोपाळ, २६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ३९ उमेदवारांची दुसरी जाहीर केली. याआधी भाजपाने १७ ऑगस्ट रोजी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पक्षाने त्याच दिवशी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.
मध्य प्रदेशसाठी पहिली यादी जाहीर करताना भाजपाने जिथे पराभव झाला त्या ३९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते. भाजपाच्या मध्य प्रदेशसाठीच्या दुसऱ्या यादीत तीन केंद्रीय मंत्री आणि चार खासदारांचा उमेदवार म्हणून समावेश आहे. नरेंद्र सिंह तोमर, फग्गन सिंह कुलस्ते आणि प्रल्हाद सिंह पटेल यांचा भाजपाच्या मध्य प्रदेशसाठीच्या दुसऱ्या यादीत उमेदवार म्हणून समावेश करण्यात आला आहे.
केंद्रीयमंत्री नरेंद्र सिंह तोमर दिमनीतून, केंद्रीयमंत्री फग्गन सिंह कुलस्ते निवासमधून, केंद्रीयमंत्री प्रल्हाद सिंह पटेल नरसिंगपूरमधून, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय इंदूर – १ येथून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. खासदार राकेश सिंह जबलपूर पश्चिममधून, खासदार गणेश सिंह सतनातून, खासदार रीती पाठक सीधीतून, खासदार उदय प्रताप सिंह गाडरवारातून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.