नवी दिल्ली, ९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : भारताच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत जी २० समुहाच्या राष्ट्रप्रमुखांची बैठक सुरू आहे. या बैठकीत एक मोठा निर्णय अंमलात आणण्यात आला. जी २० गटाला आता जी २१ गट या नावाने ओळखले जाणार आहे. आफ्रिका समुहाच्या समावेश जी २० आता जी २१ या नावाने ओळखला जाणार आहे. आफ्रिका समुहाच्या समावेशामुळे जी २० गट हा जागतिक अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा आणि प्रभावी प्रतिनिधी झाला आहे.
आफ्रिका समुहाच्या जी २० मधील समावेशाचा अर्थ
आफ्रिकन युनियन अर्थात आफ्रिका समुहामध्ये आफ्रिकेतील ५५ देश
जानेवारी २०२१ मध्ये आफ्रिकन युनियनची स्थापना
आफ्रिकन युनियनची अर्थव्यवस्था ही जगातील आठव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था
जगातील बारा देशांच्या अर्थव्यवस्थेचा वेगाने विस्तार
बारा देशांमध्ये सहा देश आफ्रिकेतील
आफ्रिका समूह कच्च्या मालाचा सर्वात मोठा पुरवठादार
आफ्रिकेतील खनिज संपत्ती जगासाठी महत्त्वाची
भारताला होणार असलेले फायदे
आफ्रिकेच्या समावेशाचा निर्णय भारताच्या प्रयत्नांमुळे
आफ्रिकेतील देशांमध्ये भारताचे राजकीय महत्त्व वाढणार
भारत-आफ्रिका समूह यांच्यातील आंतरराष्ट्रीय व्यापार वाढण्याची शक्यता
कडेकोट बंदोबस्तात दिल्लीत जी २०
कडेकोट बंदोबस्तात दिल्लीत जी २० सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेत ‘एक पृथ्वी’ हे पहिले सत्र सकाळी तर ‘एक कुटुंब’ हे दुसरे सत्र दुपारी पार पडेल. त्यानंतर रात्री आठ ते सव्वा नऊ या वेळेत सर्व राष्ट्रप्रमुखांची पुन्हा चर्चा होईल. तर संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत जी-२०च्या नेत्यांसाठी राष्ट्रपतींकडून विशेष डिनरचं आयोजन करण्यात आले आहे. जी २० ही परिषद शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस आहे. परिषदेसाठी नियोजन करणे सोपे व्हावे म्हणून दिल्लीतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना तीन दिवसाची सुटी देण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.