मोदी इंडोनेशियात, बायडेन भारतात

मोदी इंडोनेशियात, बायडेन भारतात

नवी दिल्ली, ६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियान परिषदेसाठी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा आटोपून पंतप्रधान गुरुवारी संध्याकाळी दिल्लीत परतणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन पण आज संध्याकाळी भारतात येणार आहेत. ते जी २० परिषदेसाठी भारतात येत आहेत. बायडेन रविवार १० सप्टेंबरपर्यंत भारतात असतील.

एकविसावे शतक ‘आसियान’चे

एकविसावे शतक ‘आसियान’चे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते इंडोनेशियात ‘आसियान’मध्ये बोलत होते. ‘आसियान’ची जागतिक विकासात महत्त्वाची भूमिका आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

जी २० परिषद

भारतात दिल्ली येथे ९ आणि १० सप्टेंबर रोजी जी २० देशांची परिषद होत आहे. या बैठकीला ३० पेक्षा जास्त देशांचे राष्ट्रप्रमुख, युरोपियन युनियनचे प्रतिनिधी, आमंत्रित अतिथी देश आणि १४ आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख उपस्थित असतील.

१. ‘जी २०’ शिखर परिषदेसाठी जय्यत तयारी
२. ‘एआय’ निवेदक करणार स्वागत
३. येत्या शनिवारी, रविवारी ‘जी २०’ शिखर परिषद
४. ‘भारत मंडपम’वर दोन हजार सातशे कोटींचा खर्च
५. परिषदेचा मंडप ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version