बंगळुरू, २६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषद आणि ग्रीसचा एक दिवसाचा दौरा आटोपून बंगळुरू येथे आले. बंगळुरूत पंतप्रधानांनी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स कर्मचाऱ्यांची आणि इसरोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी एक नवा नारा दिला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान जय किसान’ आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या ‘जय विज्ञान’ या घोषणेला जोडूनच तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी ‘जय अनुसंधान’ ही घोषणा तयार केली. या संदर्भात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.