हिंगोलीच्या वसमतमध्ये मारहाणीत तरुणाचा मृत्यू

हिंगोलीच्या वसमतमध्ये मारहाणीत तरुणाचा मृत्यू

हिंगोली, १८ मे २०२३, प्रतिनिधी : हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये एका युवकाला आठ ते दहा जणांनी लाठ्याकाठ्या व लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केली. या मारहाणी नंतर उपचारादरम्यान त्या युवकाचा मृत्यू झाला आहे.

ओमकार हेरे असं मयत युवकाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. बहिणीला मेसेज का करतो या कारणावरून या युवकाला गंभीर मारहाण करून नांदेड रोड भागात टाकून देण्यात आलं होतं. नांदेडला उपचारादरम्यान या युवकाचा मृत्यू झाला. दरम्यान या युवकाच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह थेट वसमत शहर पोलीस ठाण्यात आणला होता.

जोपर्यंत मारेकरी अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. दरम्यान पोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात आठ ते दहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version