उद्धव ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर

उद्धव ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे शुक्रवारी शिर्डी येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर मंदिराला भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरेही असण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं गुरुवारी एकमतानं दिलेल्या निकालात म्हटलं आहे की, ते तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला पुनर्स्थापित करू शकत नाही, कारण माजी मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये बहुमत चाचणीला सामोरं न जाता राजीनामा दिला होता. या आदेशाचा अर्थ असा आहे की, शिवसेनेतील बंडखोरांचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदावर कायम राहतील. असं वक्तव्य सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केलं आणि सत्तेत असलेलं शिंदे सरकार बचावलं. अशातच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब देवदर्शन करणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version