राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्नाटक दौऱ्यावर टीका केली आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री कर्नाटकाच्या प्रचारात व्यस्त आहेत, अशी खोचक टिका खडसे यांनी केली.
एकनाथ शिंदे रविवारी कर्नाटक दौऱ्यावर होते. यादरम्यान ते कर्नाटकामध्ये भाजपा उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार होते. यावर आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदेंवर टीका केली आहे.
शिंदेच्या दौऱ्यावर खडसे काय म्हणाले?,
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री कर्नाटकाच्या प्रचारात व्यस्त आहेत. कर्नाटक प्रचाराला जायला शिंदेंना वेळ आहे, परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसोबत बैठका घ्यायला वेळ नाही.शेतकऱ्यांचा प्रश्नावर सरकारने तातडीने मदत पोहचावी ही अपेक्षा आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.