ऑगस्टमध्ये अतिवृष्टीचं भाकीत

ऑगस्टमध्ये अतिवृष्टीचं भाकीत

बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीते रविवारी (२३ एप्रिल) जाहीर झाली आहेत. सकाळी सहा वाजता सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घट मांडणीचे निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे.

यंदा महत्त्वाचा मानल्या जाणारा पिक पावसाची परिस्थिती मध्ये पाऊस जून महिन्यामध्ये कमी असेल. जुलैमध्ये साधारण, तर ऑगस्टमध्ये प्रचंड पाऊस असून अतिवृष्टीचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी असेल. मात्र अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. पिका बाबत केलेल्या भाकितांमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ आणि इतर पिके सर्वसाधारण मोघम स्वरूपाचे पीक सांगण्यात आली आहे.

मात्र उत्पन्न चांगलं असलं तरी अवकाळीने या पिकांना फटका बसणार असल्याचे भाकीत यंदाच्या भविष्यवाणीमध्ये वर्तवण्यात आल आहे. राजकीय परिस्थितीवरही यंदा भाकीत केल्या गेला आहे.. यामध्ये देशाचा राजा कायम असणार असं भाकीच वर्तवण्यात आल आहे. मात्र पारावरच्या घट मांडणीत पहिल्यांदाच विंचू निघाल्याने देशात रोगराईची परिस्थिती असणार असे भाकीत यंदा वर्तवण्यात आलं आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version