रश्मी ठाकरे मैदानात उतरणार?

रश्मी ठाकरे मैदानात उतरणार?

उद्धव गटामध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाची मोठ्याप्रमाणात वाताहात झाली आहे. त्यामुळे पक्षाला नवी उभारी देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता राज्यभरात सभा घेत असून शिवसैनिकांशी संवाद साधत आहे. मात्र आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ रश्मी ठाकरे राजकीय आखाड्यात उतरणार आहे. नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची होणारी पतझड रोखण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी रश्मी ठाकरे नाशिकचा दौरा करणार आहे.

विस्कटलेल्या संघटनात्मक बांधणीसाठी रश्मी ठाकरे मैदानात उतरल्याचे सांगितले जात आहे. नाशिकमध्ये महिला मेळाव्यातून रश्मी ठाकरे या शक्तीप्रदर्शन करणार आहे. याआधीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांना रश्मी ठाकरे या नेहमी नेहमी हजर राहिल्या. पण, आता पक्षाची अवस्था पाहता रश्मी ठाकरे स्वत: लक्ष देणार आहे. विस्कटलेली संघटनात्मक घडी नीट करण्यासाठी त्या नाशिकच्या मैदानात उतरणार आहे. येत्या महिना अखेरीस त्या नाशिकचा दौरा करणार असुन महिला मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन करतील.

ठाकरे यांच्या पक्षातील महिला आघाडीत खरेतर मोठे चेहरे नाशिकमध्ये नाही. त्यात माजी नगरसेविकाच नाशिकची महिला आघाडी सांभाळत होत्या. मात्र मागच्या महिण्यात काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे संजय राऊत यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे. हीच महिला आघाडी पुन्हा बळकट करण्यासाठी आता संजय राऊत यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये रश्मी ठाकरे स्वतः मेळावे घेणार आहे. पक्षातील पडझड रोखण्यासाठी रश्मी ठाकरे मैदान गाजवणार आहे. त्यामुळे रश्मी ठाकरे यांच्या मेळाव्याची जोरदार तयारी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version