नातवाने केली आजोबांच्या कुशीत दंगामस्ती

नातवाने केली आजोबांच्या कुशीत दंगामस्ती

कोरोनामधल्या दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त होळी धुळवड राज्यभरात साजरी होत आहे. अनेक सामाजिक आणि सेलिब्रिटी धुळवड साजरी करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे ठाण्यात कुटूंबासोबत धुळवड साजरी करताना दिसून आले. यावेळी त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह व नातवासह त्यांनी धूलिवंदन साजरे केले.

ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंकडून कुटुंबियांसह धुळवड साजरी करण्यात आली आहे. कोरोना नंतर दोन वर्षांनी आज मोठ्या प्रमाणात धुळवड साजरी करताना दिसून येत आहे. आपले सरकार आल्यापासून गोविंदा असो की दिवाळी की होळी सर्व जण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version