‘देशभरात सरकार बदलाचे वारे’

‘देशभरात सरकार बदलाचे वारे’

नुकत्याच झालेल्या त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय विधानसभा निवडणुकांत यश मिळाल्याचा दावा करत भाजपकडून जल्लोष करण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी देशभरात बदलाचे वारे आहे, असे म्हणत  भाजपवर हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले, ‘मला वाटते की, आता देशात बदलाचे वातावरण तयार होत असून देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होतो आहे. अलीकडेच महाराष्ट्रात पदवीधर आणि शिक्षक संस्था मतदारसंघासह इतर तीनचार निवडणुका झाल्या. त्या निवडणुका काय सांगतात? जवळपास सगळीकडे भाजपला एखाद दुसरी जागा सोडली तर यश मिळाले नाही. या निवडणुकांचे निकाल हेच सांगत आहेत. सरकार त्यांचं, सत्तेच्या वापर त्यांचा हे या निवडणुकीत दिसून आले. तरीही भाजपला यश मिळालं नाही, असं त्यांनी सांगितले.

पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही. ते जगजाहीर आहे, त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही, मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये देशाचे चित्र बदलत आहे, असे शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी देशात कोण-कोणत्या राज्यांत भाजप नाही, याची यादीच दिली. पवार म्हणाले, आंध्र प्रदेशात भाजप नाही. त्यानंतर पंजाबमध्ये भाजप नाही. दिल्लीत भाजप नाही. हिमाचल प्रदेशातही भाजप नाही. ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगाल यांच्या राज्यात भाजप नाही. केरळ, तामिळनाडूमध्ये आज भाजप नाही. पुढे येण्याची शक्यताही नाही. कर्नाटकात पूर्वी काँग्रेसची सत्ता होती. पण तेथेही आमदार फोडून भाजपने सत्ता स्थापन केली. उद्या निवडणुका होतील तेव्हा लोक विचार करतील, असं ते म्हणाले.

कसबा पोटनिवडणुकीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, कसबा या भाजपच्या बालेकिल्ल्यात अगदी सदाशिव पेठ, नारायण पेठ येथेही भाजपला कमी मते मिळाली. यावरुन लोकांना आता बदल हवा आहे, हे स्पष्टपणे दिसत आहेनिवारी भाजप नाही. पुढे येण्याची शक्यताही नाही. कर्नाटकात पूर्वी काँग्रेसची सत्ता होती. पण तेथेही आमदार फोडून भाजपने सत्ता स्थापन केली. उद्या निवड. केरळ, तामिळनाडूमध्ये शणुका होतील तेव्हा लोक विचार करतीलच. असे शरद पवार म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version