पवन खेडा यांची जामिनावर सुटका

पवन खेडा यांची जामिनावर सुटका

रायपूरमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनाला जात असताना पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांना पोलिसांनी अटक करण्यात आली होती. दिल्ली विमानतळावरून त्यांना अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी आसाम पोलिसांच्या शिफारशीवरून ही अटक केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे खेडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आसामच्या हाफलाँग येथे काँग्रेस नेते पवन खेडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांना सर्वोच्च न्यायालयानं अंतरीम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे खेडा यांची सुटका झाली आहे. असून त्यांना ताब्यात घेण्याचा आसाम पोलिसांचा प्रयत्न फसला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी मंगळवारी होणार असून तोपर्यंत खेडा यांना नियमित जामिनासाठी अर्ज करता येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version