शरद पवार करणार प्रचार

शरद पवार करणार प्रचार

पुणे पोटनिवडणुकीसाठी पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून जोर लावण्याचा प्रयत्न होत आहे. या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उतरले आहे. तर दुसरीकडे चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.

पुण्यात पोटनिवडणुकीच्या ज्वर शिगेला पोहचला आहे. कसबा मतदार संघात महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर आणि भाजप कडून हेमंत रासने निवडणूक रिंगणात आहेत. तर, चिंचवड मतदार संघात भाजपच्या अश्विनी जगताप तर महाविकास आघाडीचे नाना काटे रिगणात आहेत. तर राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे. पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी शरद पवार लवकरच मेळावे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. २१ आणि २२ फेब्रुवारीला ते या दोन्ही मतदार संघात फिरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version