फडणवीस रात्री उशिरा जगताप कुटुंबियांच्या भेटीला

फडणवीस रात्री उशिरा जगताप कुटुंबियांच्या भेटीला

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे याला निवडणुकीच्या रिंगणात उभा करण्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यावर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे.

चिंचवड आमदार लक्ष्मण जगताप यांची काल पहिली जयंती होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री जगताप कुटुंबीयांना भेटून, त्यांच्याकडे चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीच्या प्रचाराबद्दल चौकशी केली. व त्यानंतर फडणवीस यांनी दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भाजपा उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप या भरगोस मतांनी निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी पक्षात बंडखोरी झाल्याने त्यामागे कोणतरी मोठा नेता असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले असून महाविकास आघाडीला स्वतःचं घर सांभाळता येत नाही आणि ते आमच्यावर आरोप करत आहेत. उगीच आमच्या डोक्यावर खापर फोडू नये. असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version