महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकीचे फोन आल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलगी आणि जावयावर गोळी झाडण्याची धमकी देखील देण्यात आलीय आली असून धमकीचा ऑडिओ क्लिप पण व्हायरल झाला आहे.
या प्रकरणात बाबाजीचे नाव आल्याने चर्चेला उधाण आलं आहे. स्पेनमध्ये मारेकरी तयार ठेवल्याचे रिकॉर्डींगमध्ये उल्लेख आहे. तसेच महेश आहेर ठाणे मनपाचे सहाय्यक आयुक्त यांनी धमकावल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. आव्हाड समर्थकांकडून महेश आहेर यांना मारहाण करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.