तुरुंगातही अन्नत्याग आंदोलनावर ठाम

तुरुंगातही अन्नत्याग आंदोलनावर ठाम

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तुपकर यांची १४ चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. तुपकरांसह त्यांच्या २५ सहकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तुपकर हे तीन दिवस भूमिगत होते. अकोला कारागृहात तुपकरांसह 25 सहकाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाऊन, पोलिसी वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

रविकांत तुपकरांनी दोन दिवसांपासून जेवण केलेले नाही, त्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर, दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयानी कोठडी सुन्यावण्यात आली आहे. तुपकर यांच्यासह त्यांच्या पंचवीस कार्यकर्त्यांची चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version