‘राज्यात वारंवार हल्ले’

‘राज्यात वारंवार हल्ले’

विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लबोल करण्यात येत आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यातील महत्वाच्या लोकांवर हल्ले होत असताना सरकार आणि पोलीस यंत्रणा काय झोपा काढत आहे का? अशी टीका करत अजित पवारांनी संताप व्यक्त केला.

आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्यात आला. कोकणातील एक पत्रकाराला संपवले, तो अपघात झाल्याच दाखवलं. यामागे कोण आहे, कोण मास्टरमाईंड आहे हे कळलं पाहिजे. पोलीस झोपा काढतायत का? सर्वसामान्यांनी कुणाकडे बघावं? कायदा सुव्यवस्था कशी अबाधित राहील, त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात यावर आम्ही आवाज उठवणार” असे अजित पवार म्हणाले.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version