तुपकरांनी वाढवली पोलिसांची डोकेदुखी

तुपकरांनी वाढवली पोलिसांची डोकेदुखी

तीन दिवसापासून रविकांत तुपकर भूमिगत झाले आहेत. तुपकरांनी मुंबई आणि बुलढाणा पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीनला भाव मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अकरा फेब्रुवारीला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर किंवा मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर रविकांत तुपकर भूमिगत झाले असून बुलढाणा पोलीस त्याच बरोबर मुंबई पोलीस त्यांची शोधाशोध करत आहे. याआधीच रविकांत तुपकर यांना आंदोलन स्थगित करण्याबाबत पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version