भाजपाची दोन दिवसीय राज्य कार्यकारणी बैठक नाशिकमध्ये आजपासून आयोजित करण्यात आली आहे. आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक पडणार पार पडणार आहे. तर शनिवारी देखील दिवसभर भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पियूष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भारती पवार यांच्यासह राज्यातील इतर महत्वाचे मंत्री देखील या बैठकीसाठी नाशिकमध्ये उपस्थित राहणार आहेत. ही बैठक १० आणि ११ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व केंद्रीय आणि राज्य मंत्री या बैठकीस हजार राहणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे मागीलवर्षी नाशिक दौऱ्यावर रवाना होत असतानाच त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात येत असल्याची घोषणा पक्षाकडून करण्यात आली होती. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर प्रदेश कार्यकारिणीचे पहिलेच अधिवेशन नाशिकला होण्याचा योगायोग देखील या निमित्ताने जुळून येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.