मुख्यमंत्र्यांच्या सभेवर राऊतांचा खोचक टोला

मुख्यमंत्र्यांच्या सभेवर राऊतांचा खोचक टोला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी वरळी मतदारसंघात भव्य सभा झाली. या सभेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कारण, या सभेत भाजपा व शिंदे गटाच्या नेतेमंडळींनी भाषणांतून ठाकरे गटावर जोरदार टोलेबाजी केली होती. या सभेतून शिंदेगट आणि भाजपा शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे बोले जात होते, मात्र अपेक्षेप्रमाणे या सभेस गर्दी नसल्याचे दिसून आले. यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्रीवर टीका सुरू केली. यावर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले, “अनेक समस्या आहेत परंतु तरी अत्यंत हीन दर्जाच्या राजकारणात जर मुख्यमंत्री पडणार असतील व त्यासाठी सत्ता वापरणार असतील. तर जनता सर्वकाही पाहात आहे. आणि मग जनता अशा मुख्यमंत्र्यांकडे पाठ फिरवते. हे काल वरळीत आपण पाहील. कोणी काही म्हणू द्या, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या आव्हानाच्या आवेशात ते व त्यांचा मिथे गट काल वरळीतील कोळीवाड्यात गेला. एक विराट सभा घेण्याचा प्रयत्न केला, शेवटी खुर्च्या उचलण्याची वेळ आली व थातूरमातूर उद्योग करून तो कार्यक्रम पूर्ण केला,” अस संजय राऊत म्हणाले आहेत.

पुढे संजय राऊत म्हणाले,”महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान होऊ नये या मताचे आम्ही आहोत. त्या पदावर जरी आमचे विरोधक बसले असले कोणीही, गद्दार, बेईमान बसले असले कुठेही तरी शेवटी मुख्यमंत्री पदाची खुर्ची आहे. आपण मुख्यमंत्री म्हणून तिथे आला होता. की केवळ आव्हानांची भाषा करणारे, फुटीर गटाचे नेते म्हणून आला होता याचा विचार आता या सगळ्यांनी केला पाहिजे,” असही संजय राऊत म्हणाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version