‘उद्धव यांचे हात मुंबईकरांच्या रक्तानं माखलेत’

‘उद्धव यांचे हात मुंबईकरांच्या रक्तानं माखलेत’

मंगळवारी संध्याकाळी वरळीत शिंदे गट व भाजपाने सभा घेतली. या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन वरळीतून निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान दिलं होत यावर देखील ठाकरे गटावर सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. उद्धव ठाकरे यांचे हात रक्ताने माखलेले आहे, असा गंभीर आरोप करत मुंबईकरांच्या प्रश्नांना घेऊन तीस दिवसांत तीन प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत, असेही शेलार यांनी जाहीर केले.

आशिष शेलार म्हणाले,’तुमचे हात मुंबईकरांच्या रक्ताने माखलेले आहेत, हा आरोप पूर्व करत आहे. कमला मिल कम्पाऊंडमध्ये अनधिकृत बांधलेल्या हुक्का पार्लर आणि बारमध्ये २०१७ रोजी आग लागून १४ मुंबईकरांचा मृत्यू झाला. देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला होता. पण उद्धव ठाकरेंनी नोव्हेंबर २०२० मध्ये आपल्या मित्राच्या सांगण्यावरुन हा गुन्हा मागे घ्यायला लावला आणि मालकाला मोकळं केलं. आमच्यावर दगड मारायचा विचार कराल तर शंभर बोटं तुमच्याकडे येणार आहेत. आम्हाला प्रतिआव्हान देण्याआधी तुमचे हात स्वच्छ आहेत का?’ असा सवाल शेलारांनी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version