सत्यजित तांबे यांच्या विजयाची कारणे ?

सत्यजित तांबे यांच्या विजयाची कारणे ?

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा मोठ्या मताने दणदणीत विजय झाला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव झाला असून त्या पहिल्या फेरीपासूनच सत्यजित तांबे यांच्यापेक्षा मतांनी पिछाडीवर होत्या. प्रत्येक फेरीअंती दोघांमधील तफावत आणखी वाढतच होती. सत्यजीत तांबे यांनी पहिल्या पसंतीची ६८९९९ इतकी मते मिळवत दणदणीत विजय मिळवला.

सत्यजीत तांबे यांचे वडील डॉ.सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदार संघातून तब्बल तीन टर्म आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा या मतदारसंघावर चांगला प्रभाव राहिला आहे. तसेच सुधीर तांबे यांचा जनसंपर्क देखील मोठा आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांच्या जनसंपर्काचा फायदा सत्यजीत तांबेंना झाला असल्याचे दिसून येत आहे.

तसेचडॉ.सुधीर तांबे हे सलग तीन वेळा आमदार आहेत. त्यांच्या निवडणुकीच्या सूक्ष्म नियोजनामुळे सत्यजीत तांबे यांचा विजय सोपा झाला असल्याचे दिसून येत आहे. तसेच निवडणुकीमध्ये प्रभावी प्रचार यंत्रणा देखील त्यांच्याकडे दिसून आली त्याचा फायदा सत्यजित तांबे यांना मोठ्या प्रमाणात झाला.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यामध्ये सत्यजीत तांबे यांची स्वत:ची यत्रंणा कार्यरत होती. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे नेटवर्क चांगले होते.

तर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात भाजपचा तांबेंना छुपा पाठिंबा राहीला. त्यामुळे तांबेंच्या विजयामध्ये भाजपचा देखील महत्वाचा वाटा महत्वाचा आहे.

पक्षविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेसने सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मात्र काँग्रेसमधील एका गटाने तांबेंना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामध्ये काँग्रेसचे स्थानिक पातळीवरील काही पदाधिकारी त्यांच्या सोबत होते. त्यामुळे सत्यजीत तांबे यांच्या विजयामध्ये काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा देखील महत्वाचा वाटा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version