शिंदे गटाची स्वतंत्र बैठक…

शिंदे गटाची स्वतंत्र बैठक…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व आमदारांची आज बैठक आयोजित केली आहे. ही बैठक २ फेब्रुवारी रोजी ११ वाजता होणार आहे. शिंदे गटाचे सर्व ५० आमदार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. ही भेट कशासाठी आहे? या मागचं कारण काय? बैठकीचा विषय काय? हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पक्षचिन्हं आणि शिवसेना कुणाची याचा निर्णय अंतिम टप्प्यात असताना आजची बैठक महत्वाची असणार आहे.

तसेच राज्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच दुपारपर्यंत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचं चित्रं स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालावरही बैठकीत चर्चा होऊ शकते असं सांगितलं जातं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version