राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आले आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा काल ईडीने धाड टाकली. जिल्हा बँकेसह ईडीकडून त्यांचा साखर कारखाना असलेल्या संताजी घोरपडे कारखान्यावरही कारवाई केली. हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेची मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ईडीकडून तपासणी करण्यात आली. काल दुपारी सुरू झालेली ही कारवाई रात्री उशीरा दोन वाजता बंद झाली. याचबरोबर मागच्या ३० दिवसांत मुश्रीफांच्या घरावर दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे.
मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीने छापे टाकले आहेत. बँकेच्या मुख्य कार्यालयासह सेनापती कापशी शाखेवर ही छापेमारी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या बँकेवर छापे पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिनाभरापूर्वीच ईडीने हसन मुश्रीफ यांच्या कागलमधल्या निवासस्थानी छापे टाकले होते, त्यानंतर आता मुश्रीफ अध्यक्ष असलेली बँक ईडीच्या रडारवर आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.