अर्थसंकल्पाकडून करदात्यांच्या अपेक्षा काय ?

अर्थसंकल्पाकडून करदात्यांच्या अपेक्षा काय ?

केंद्राचा अर्थसंकल्प आज जाहीर होणारेय, मोदी सरकारच्या काळातील हा नववा अर्थसंकल्प असून संपूर्ण देशाचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. कोणत्या घटकाला दिलासा मिळणार आणि कुणावर कराचा बोजा लादला जाणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्पाकडून करदात्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत.

गेली ८ वर्षे न वाढलेली करमुक्त उत्पनाची मर्यादा अडीचवरून पाच लाख करावी तसेच गृहकर्ज व्याजावरची वजावट २ वरून ४ लाख इतकी करण्यात येण्याबरोबर कलम ८० सीअंतर्गत मिळणारी वजावट वाढवण्यात यावी, वैद्यकीय विमा हप्त्यावरची वजावट २५ वरून ५० हजार इतकी वाढवावीशेअर्स, इक्विटी फंडवरील दीर्घकालीन करमुक्त भांडवल नफा १ वरून ३ लाख करावा इत्यादी. त्यामुळे अर्थसंकल्पावर संपूर्ण देशाचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version