सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर

सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर

सत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे. 14 फेब्रुवारीला सुनावणी होणार असून 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण वर्ग करण्याबाबत कोणता निर्णय होऊ शकलेला नाही.

6 महिन्यांपासून राज्यातील सत्तानाट्याचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांच्या घटनापीठाकडे ही सुनावणी होणार की सात जणांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण सोपविले जाणार, याचा फैसला या सुनावणीत घेतला जाणार आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सात जणांच्या खंडपीठाकडे करावी, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने मागच्या सुनावणीत केली होती. त्यामुळे या मागणीवर आज निर्णय होण्याची शक्यता होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version