सत्तासंघर्ष ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का ?

सत्तासंघर्ष  ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का ?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार आहे. परंतु आता हे प्रकरण 7 न्यायाधिशांच्या खंडपीठाकडे सोपवले जाणार ? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर निवडणूक आयोगातही सेनेच्या चिन्हाबातही आज सुनावणीची शक्यता आहे. आज दुपारनंतर सुनावणी होऊ शकते.

आता उद्धव ठाकरे गटाकडून मागणी करण्यात आली आहे की, हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवले जावे. ही विनंती मान्य केली जाणार का? की 5 न्यायाधीशांचेच खंडपीठ सुनावणी घेणार याबाबत उत्सुकता आहे. गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात खटला सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटातर्फे विविध याचिका करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. परिणामी आजच्या सुनावणीत काय होते याबाबत उत्सुकता आहे.

सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आसाममधील नबाम रेबिया प्रकरणाचा उल्लेख केला. एक प्रकरण पूर्वी सुप्रिम कोर्टात आले होते. 2016 च्या अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबियाचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात न्यायालयाने अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना पीठासीन अध्यक्षांना कारवाईचा अधिकार नाही असा निकाल दिला.त्यानंतर सर्वोच्च न्यायालाने 13 जुलै 2016 मध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार स्थापन करण्याचे आदेश देत राज्यपालांचं कृत्य अवैध ठरवलं होतं. राज्याच्या सत्तासंघर्षात या प्रकरणाचा वारंवार उल्लेख करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version