रविवारी मिरजेत बंद

रविवारी मिरजेत बंद

मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर असणारी दुकाने ब्रह्मानंद पडळकर यांनी पाडल्याच्या निषेधार्थ रविवारी मिरज बंदची हाक देण्यात आली आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधु ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरजेतील दुकाने आणि हॉटेल पाडल्याच्या निषेधार्थ आज मिरज शहरात बंद पाळण्यात येत आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मिरज बंदची हाक देण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट एमआयएम, पी आर पी, आर पी आय पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांच्यावतीने उत्स्फूर्तपणे बंद पाळण्याबाबतच आवाहन करण्यात आल आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील दुकाने ब्रह्मानंद पडळकर यांच्या टोळीने रातौरात पाडली. या निषेधार्थ मिरजेतील सर्व पक्ष संघटना एकत्रित आले आहेत. मिरजेतील सर्वपक्षीय पदाधिकारी व सामाजिक संघटना त्यांची शनिवारी सायंकाळी बैठक पार पडली. या बैठकीत पडळकर यांच्या निषेधार्थ हा बंद पाळण्याचे निश्चित करण्यात आली असून त्यामध्ये मिरजकर यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बंद दरम्यान मिरजेत येणारी व मिरजेतून बाहेर जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर मिरजेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version