शरद पवार गट अजित पवार यांच्या विरोधात?

शरद पवार गट अजित पवार यांच्या विरोधात?

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हतेच, ते स्वराज्यरक्षक होते असे विधान केले होते. त्या विधानांनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होत. या वादाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद या बाबत स्पष्टीकरण दिले असून संभाजी महाराज हे स्वराज्यक्षक आहेत, या वक्तव्याव मी अजूनही ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आता राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर अजित पवार यांचं चुकीचं असतं, तर विधान सभेत त्याचवेळी त्यांना सांगायला हवं होतं की, हे रेकॉर्डवर चुकीचं जात आहे. असं छगन भुजबळ म्हणाले.

त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनी राष्टवादी अध्यक्ष शरद पवार जाणता राजा असल्याचं वक्तव्य केलं होत. त्यावर राजकारणात अनेक नेत्यांनी यावर प्रश्न उपस्थितीत केले. त्याबाबतीत अजित पवार यांना विचारलं असता ‘मी कुठे म्हणतो माझ्या काकाला जाणता राजा म्हणा’ अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती. आणि त्यावर छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यालाही सहमती दर्शविली आहे. ‘शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यात काय चूक आहे. आम्हाला म्हणायचा म्हणू. तुम्ही म्हणू नका’, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

छगन भुजबळ म्हणाले की, “राज्यकर्त्याला पूर्वीच्या भाषेत राजाच म्हंटले जात होते. आणि शरद पवार हे राजकारणातून चार वेळा मुख्यमंत्री झाले. देशभरात इतर पदेही भूषविली. त्यांनी गोरगरिबांचे प्रश्न सोडवले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. पुणे, नाशिक, मुंबईमध्ये 80 टक्के ऑटोमाबाइल्सचे कारखाने शरद पवार यांनी आणले. उद्योगधंदा वाढवला. शिक्षणाच्या बाबतीमध्ये काम केले. मी त्याला साक्ष आहे.” असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version