राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपा नेते अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यानंतर अजित पवार माध्यमांसमोर येऊन या विषयी काय बोलणार यावर सर्वचं लक्ष लागलं होत. अखेर अजित पवार यांनी नुकतेच त्यांचे मत मांडून भाजपकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे उत्तरे दिली आहेत.
मी काही चुकीचं बोललो नाही असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या संभाजी महाराज्यांच्या वक्तव्यावर मी महापुरुषांबद्दल,स्त्रियांबद्दल कधीही चुकीचा बोललो नाही. मी माझ्या भूमीकेवर ठाम आहे असे म्हणत अजित पवारांनी आपलं मत मांडलं आहे.
संभाजीराजेंना स्वराज्य रक्षक असंच म्हणावं ही माझी भूमिका आहे. मात्र शरद पवार यांनी सांगितल्या प्रमाणे जे धर्मवीर म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही जर तुमच्या मोबाइलमध्ये धर्मवीर शब्द शोधलात तर जवळपास सात आठ लोकं आहेत ज्यांना धर्मवीर म्हटलं गेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याचे रक्षक संभाजी महाराज होते. ज्यांना माझी भूमिका पटत नाही त्यांनी सोडून द्या. बाकीच्यांनी मला काहीही सांगू नये असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
भाजपने मला विरोधी पक्ष नेते पद दिलेले नाही. त्यामुळे त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. भाजपने माझ्याविरोधात आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले आहे. महापुरुषबद्दल बेताल वक्तव्य तर सत्ताधारी पक्षांनी केली आहे. त्यांच्यावर कारावाई होत नाही. ते माफी मागायला तयार नाही, दिलगिरी व्यक्त करत नाहीत. मी वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे.असं विधान अजित पवार यांनी केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.