मनसेला मंत्रिपद देण्यास रामदास आठवलेंचा विरोध

मनसेला मंत्रिपद देण्यास रामदास आठवलेंचा विरोध

मनसेला मंत्रीमंडळात घेण्याचा काही संबंधच येत नाही. ते निवडणूकीत आमच्या सोबत नव्हते. त्यांना मंत्रीपद देण्याचा विचार होत असेल तर आमचा विरोध असेल असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. आरपीआयला नक्कीच एखादं मंत्री पद मिळेल सत्तेत सहभाग मिळेल. अधिवेशनापुरत जे मंत्री मंडळ आहे ते शॉर्टमध्ये बनवण्यात येणार आहे. जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा आरपीआयला नक्कीच एखादं मंत्री पद मिळेल सत्तेत सहभाग मिळेल.

या कार्यक्रमात रामदास आठवले यांनी ‘रिपाई’ला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एखादे मंत्रीपद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. इतकेच नाही दोन तृतीयांश पेक्षा जास्त आमदार ज्यांच्या बाजूने आहेत, तिच खरी शिवसेना असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी २०० जण आम्ही निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे. आरपीआय ज्यांच्या बाजूला असते त्यांना सत्तेवर येण्याची संधी मिळते. माझा पक्ष एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले. मनसेला मंत्रीमंडळात घेण्याचा काही संबंधच येत नाही. ते निवडणूकीत आमच्या सोबत नव्हते. त्यांना मंत्रीपद देण्याचा विचार होत असेल तर आमचा विरोध असेल असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version