आर्यन खानला एनसीबीकडून दिलासा

आर्यन खानला एनसीबीकडून दिलासा

कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेला आर्यन खान याला अमली पदार्थ नियंत्रण कक्ष अर्थात एनसीबीकडून क्लीनचीट देण्यात आली आहे. एनसीबीकडून शुक्रवारी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये एनसीबीकडून आर्यनला क्लीनचीट देण्यात आली. आर्यन खानला कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज नव्हते, असे एनसीबीने म्हटले आहे. यामुळे शाहरूख खान आणि आर्यन खान यांनी दिलासा मिळाला आहे.

क्रुझ ड्रग्स प्रकरणी एनसीबीकडून आरोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आले. या आरोपपत्रात एनसीबीने एनडीपीएस कायद्याअंतर्गात एकुण १४ जणांवर ड्रग्स सेवनाचा ठपका लावण्यात आला आहे. तर सहा जणांवर पुराव्याअभावी गुन्हा मागे घेण्यात आला आहे. एनसीबीने कॉर्डिलिया क्रुझवर जेव्हा धाड टाकली होती तेव्हा आर्यन खान आणि मोहक यांना वगळून सगळ्या व्यक्तींकडे ड्रग्स सापडले होते. अशी माहिती एनसीबी अधिकारी संजय कुमार यांनी दिली आहे. एनसीबीने कोर्टाला मार्च अखेरीस ६० दिवसांची मुदतवाढ दिली. याप्रकरणी आर्यन खानसह २० जाणांना अटक झाली होती. आता आर्यनला दिलासा मिळाला आहे कारण त्याच्या विरोधात आरोपत्र दाखल झालेलं नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version