‘नाटो-रशिया यांच्यातील सामना म्हणजे तिसरे महायुद्ध’ – अमेरिका

‘नाटो-रशिया यांच्यातील सामना म्हणजे तिसरे महायुद्ध’ – अमेरिका

रशिया आणि नाटो यांच्यातील संघर्ष हे तिसरे महायुद्ध असल्याचा धोका अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केला आहे. मात्र, हे युद्ध रोखण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असेही ते म्हणाले आहेत.

अमरेरिकेचे अध्यक्ष जो बायडन म्हणाले, आम्ही नाटो भागातील प्रत्येक इंचाचे रक्षण करू. आम्ही युक्रेनमध्ये रशियाविरोधात युद्ध लढणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच पुतीनचे युक्रेनविरुद्धचे युद्ध कधीही यशस्वी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच, रशियाच्या व्यापारावर आणखी प्रतिबंध लावणार असल्याचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले आहे. रशियातून अन्नपदार्थ आणि मद्य आयातीवर बंदी घालण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी  केली आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा आज सतरावा दिवस आहे. युद्धाच्या सतराव्या दिवशीही रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरू असून रशिया कीव शहर ताब्यात घेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान, पंचवीस लाख नागरिकांनी युक्रेन शहर सोडले असल्याचा दावा संयुक्त राष्ट्राने केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version