खड्डे बुजवले पण रस्त्यावरचं डांबर आलं चक्क हातात…; रस्ता दुरूस्तीनंतरचा व्हिडीओ समोर, नागरिकांचा संताप

सध्या पुण्यात रस्त्यांवरील खड्डे डांबर टाकून बुजवण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही ठिकाणचे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले आहे आणि होत आहे, याचा पुरावा समोर आला आहे.
खड्डे बुजवले पण रस्त्यावरचं डांबर आलं चक्क हातात…; रस्ता दुरूस्तीनंतरचा व्हिडीओ समोर, नागरिकांचा संताप

Pune Pothole Repair Scam : पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये, जिथे दररोज कोट्यवधींची उलाढाल होते, अशा ठिकाणीही रस्त्यांवर मोठे खड्डे दिसतात. प्रशासन अनेकदा खड्डे बुजवते, पण काहीवेळा हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असते, याचा प्रत्यय देणारा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्यातील एका रस्त्यावर कंत्राटदाराने दुरुस्तीचे काम केल्यानंतर अवघ्या तासाभरातच रस्त्यावर टाकलेले डांबर अक्षरशः कारपेट काढावे तसे निघू लागले आहे!

रस्ता दुरुस्तीतील नियमांचे उल्लंघन
सध्या पुण्यात रस्त्यांवरील खड्डे डांबर टाकून बुजवण्याचे काम सुरू आहे. रस्ता दुरुस्त करताना तो आधी व्यवस्थित स्वच्छ करणे, त्यावर साचलेली माती काढणे आणि दगड समांतर करणे आवश्यक असते. त्यानंतर खडी टाकून त्यावर डांबराचा थर दिला जातो.

हेही वाचा – Job Opportunity: केवळ मुलाखत द्या आणि सरकारी नोकरी मिळवा; या क्षेत्रातील तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी

चुकीची पद्धत: व्हायरल झालेल्या व्हिडिओतील रस्त्याच्या कामात मात्र थेट खडी आणि डांबर टाकून रोलर फिरवण्यात आला. परिणामी, डांबर सुकताच भिंतीचे पापुद्रे जशा निघतात तशा त्याच्या खपल्या निघू लागल्या. निकृष्ट दर्जाचे हे काम पाहून नेटकरी संतप्त झाले आहेत.

नेटकऱ्यांचा संताप आणि कारवाईची मागणी
हा व्हिडिओ @punekarnews या 'एक्स' अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 39 हजारांहून अधिक वेळा पाहिले गेले असून, अनेक नेटकऱ्यांनी या निकृष्ट कामाबद्दल आपला संताप व्यक्त केला आहे.
अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, "हा रस्ता पुन्हा खराब होणारच आहे, त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर तातडीने कठोर कारवाई करा." निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लोकांच्या पैशाची आणि वेळेची होणारी नासाडी थांबवण्याची मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा – Maharashtra Agriculture Scheme: अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतजमिनींसाठी मोठा दिलासा; राज्य सरकारचा 'हा' ऐतिहासिक निर्णय

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version