सिडकोतील अनधिकृत ३८ नळ कनेक्शन तोडले

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम आता हाती घेतली आहे.
सिडकोतील अनधिकृत ३८ नळ कनेक्शन तोडले

छत्रपती संभाजीनगर, १६ मे २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम आता हाती घेतली आहे. सिडको एन ४ भागातील तिरुपती पार्कमधील मनपाच्या जुन्या १५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील ३८ अनधिकृत नळ कनेक्शन काल तोडण्यात आले.मनपाच्या पथकाने ही कारवाई केली.मनपा प्रशासक जी.श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अनधिकृत नळ जोडणी शोधपथकाचे प्रमुख तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांच्या अधिपत्याखाली सिडको एन ४ भागातील तिरुपती पार्क येथे मनपाच्या जुन्या १५० मिमी जलवाहिनीवरील ३८ अनधिकृत नळ तोडण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version