Telegram App Ban: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! टेलिग्राम ॲपवर बंदी, दिली महत्त्वाची माहिती

तसेच काही ठिकाणी पेपर विक्रीचे संदेशही व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे.
Telegram App Ban: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! टेलिग्राम ॲपवर बंदी,  दिली महत्त्वाची माहिती

NEET परीक्षेच्या पेपर संदर्भात सोशल मीडियावर, विशेषतः Telegram ग्रुप्सवर पेपर लीक झाल्याचे आणि विक्री झाल्याचे दावे समोर येत आहेत. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही Telegram चॅनेल्सवर NEET पेपरशी संबंधित सामग्री शेअर केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी पेपर विक्रीचे संदेशही व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे.

टेलिग्राम या ॲपवर केंद्र सरकारने तात्पुरत्या स्वरुपात बंदी आणली आहे. साधारणपणे 22 जूनपर्यंत हे ॲप बंद राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. 30 जूनपर्यंत मेसेज एडिट करण्याची परवानगी देता येणार नाही असंही म्हटलं आहे.

हेही वाचा- Pawan Raje Nimbalkar Murder Case: पाठलाग करून रस्त्यातच घातल्या गोळ्या; 20 वर्षांनंतर पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज लागणार निकाल 

या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे. सायबर सेलकडून संबंधित Telegram ग्रुप्स आणि अकाउंट्सची तपासणी केली जात असून, या मागे कोण आहे याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, अधिकृतपणे अद्याप पेपर लीक झाल्याची पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र या प्रकारामुळे NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version