Gold-Siver Rates Toaday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना परदेश प्रवास टाळण्याचे आणि सध्या सोने-चांदीमधील गुंतवणूक किंवा खरेदी मर्यादित करण्याचे आवाहन केले होते. असे असूनही देशात सध्या लग्नसराईचा जोरदार हंगाम सुरू असल्याने सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वाढत्या किमतींमुळे ग्राहक दागिने खरेदी करताना 10 वेळा विचार करत असले, तरी खरेदीची हौस अजिबात कमी झालेली नाही. याच दरम्यान ग्राहकांसाठी एक संमिश्र बातमी आहे; देशांतर्गत बाजारात सलग 2 दिवस सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे, मात्र दुसरीकडे चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली आहे.
सोन्याची चमक सलग दुसऱ्या दिवशी फिकी
आज, 19 मे रोजी दिवसभर स्थिर राहिल्यानंतर सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदवली गेली. या गेल्या २ दिवसांच्या कालावधीत 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 710 रुपयांनी स्वस्त झाले आहेत, तर 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 660 रुपयांनी घसरले आहे. देशाची राजधानी दिल्लीचा विचार केला तर, आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे भाव 10 रुपयांनी कमी झाले असून 22 कॅरेट सोन्याच्या दरातही 10 रुपयांची घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, बॉण्ड यील्डमधील तेजी आणि अमेरिका-इराण कराराबाबतची अनिश्चितता यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
भारतात विविध शहरांमध्ये सोन्याचे आजचे भाव किती ?
देशातील मोठ्या शहरातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट शुद्धता असलेल्या 10 ग्रॅम सोन्याची किमती जाणून घेऊया..
दिल्ली : आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,56,360 रुपये, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,43,340 रुपये आणि 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 1,17,310 रुपये इतका आहे.
मुंबई : आज मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,56,210 रुपये, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,43,190 रुपये आणि 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 1,17,160 रुपये इतका आहे.
बंगळुरू : आज बंगळुरूत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,56,210 रुपये, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,43,190 रुपये आणि 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 1,17,160 रुपये इतका आहे.
कोलकाता : आज कोलकात्यात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,56,210 रुपये, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,43,190 रुपये आणि 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 1,17,160 रुपये इतका आहे.
चेन्नई : आज चेन्नईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,60,090 रुपये, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,47,490 रुपये आणि 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 1,23,090 रुपये इतका आहे.
आयात शुल्कात वाढ आणि किमतींवर परिणाम
सोन्या-चांदीच्या किमती वाढण्यामागे आयातीवरील करांचे नवे नियम देखील कारणीभूत ठरत आहेत. केंद्र सरकारने यांच्या आयातीवरील शुल्क 6 टक्क्यांवरून थेट 15 टक्क्यांपर्यंत वाढवले असून, याचा थेट परिणाम बाजारातील दरांवर होत आहे. याशिवाय चांदीची चमक वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे चांदीचे अनेक प्रकार आता ‘फ्री’ आयात यादीतून काढून ‘रिस्ट्रिक्टेड’ म्हणजेच प्रतिबंधित श्रेणीत टाकण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की, आता सरकारी मंजुरीशिवाय चांदीच्या अनेक प्रकारांची आयात करता येणार नाही. आयात मर्यादित झाल्यामुळे बाजारात चांदीचा तुटवडा निर्माण होऊन किमती चांगल्याच कडाडल्या आहेत.
चांदी प्रति किलो 3 लाखांच्या पार; चेन्नईत सर्वाधिक दर
एक दिवस स्थिर राहिल्यानंतर चांदीच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी प्रचंड वाढ झाली आहे. याआधी सलग 3 दिवस चांदी स्वस्त झाली होती, परंतु या गेल्या 2 दिवसांत चांदीच्या दरात प्रति किलोग्राम तब्बल 10,100 रुपयांची अफाट वाढ झाली आहे. आज दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे चांदी प्रति किलो 100 रुपयांनी महाग होऊन 2,90000 रुपयांवर पोहोचली आहे. तर, दक्षिण भारतातील चेन्नई शहरामध्ये चांदीचा दर देशात सर्वाधिक असून तेथे 1 किलो चांदीसाठी तब्बल 300100 रुपये मोजावे लागत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.