Latest Gold Silver Prices : सोनं घसरलं, चांदी विक्रमी उंचीवर; जाणून घ्या आजचे दर

जागतिक मागणी, डॉलरचा दर आणि कच्च्या तेलाच्या किंमती यांचा थेट परिणाम भावांवर दिसून आला आहे. दरम्यान, सरकारने साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीवर निर्बंध लावून परवाना घेणे बंधनकारक केले आहे.<br/>
Latest Gold Silver Prices : सोनं घसरलं, चांदी विक्रमी उंचीवर; जाणून घ्या आजचे दर

जळगावच्या सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या भावामध्ये मोठी हालचाल पाहायला मिळाली. गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात तब्बल हजार रुपयांनी घसरण झाली, तर चांदीने विक्रमी उंची गाठत दीड लाखांचा टप्पा गाठला. आज स्थानिक बाजारपेठेत 24 कॅरेट सोन्याचा दर 113,500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवण्यात आला. कर व जीएसटीसह हा दर जवळपास 1,17,000 रुपयांपर्यंत पोहोचतो. मागील दिवशीच्या तुलनेत सोन्याच्या दरात सुमारे 1,000 रुपयांनी घट झाली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही घसरण ग्राहकांसाठी काहीशी दिलासा देणारी ठरत आहे.

दुसरीकडे, चांदीचा दर मात्र सातत्याने वाढत असून आज त्याने विक्रमी पातळी गाठली आहे. एका महिन्यात चांदीच्या भावात जवळपास 15,000 रुपयांची भर पडली. मागील महिन्यात एक किलो चांदीचा दर 1.27 लाख रुपये होता, जो आता वाढून 1.38 लाखांवर गेला आहे. जीएसटीसह हा भाव 1.42 लाख रुपये प्रति किलो इतका झाला आहे.

हेही वाचा – Share Market Today : बाजार कोसळला ! ट्रम्पच्या 100% टॅरिफ बॉम्बचा शेअर मार्केटवर परिणाम 

तज्ज्ञांच्या मते, औद्योगिक क्षेत्रातील वाढलेली आंतरराष्ट्रीय मागणी ही चांदीच्या दरवाढीमागील मुख्य कारण आहे. त्यातच जागतिक बाजारातील अस्थिरता, डॉलरचा दर, व्याजदरांतील बदल आणि कच्च्या तेलाचे भाव यांचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतींवर होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतही दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – Tax Audit Report: ऑडिट अहवाल दाखल करण्याची अंतिम मुदत वाढली; आता 'या' तारखेपर्यंत करता येतील अर्ज 

दरम्यान, केंद्र सरकारने साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीवर 31 मार्च 2026 पर्यंत निर्बंध लादले आहेत. मुक्त व्यापार करारांचा गैरवापर रोखण्यासाठी आणि तयार दागिन्यांच्या नावाखाली होत असलेल्या मोठ्या आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. आता या श्रेणीतील वस्तूंसाठी आयात परवाना घेणे बंधनकारक राहील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version